'सर्जिकल स्ट्राइक' फत्ते करणाऱ्यांना 'शौर्य पदकं'

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 26, 2017 01:13 PM IST

'सर्जिकल स्ट्राइक' फत्ते करणाऱ्यांना 'शौर्य पदकं'

surgical-strike-7591

26 जानेवारी : भारताने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकव्याप्त काश्मिरात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकफत्ते करणाऱ्या लष्करातील अधिकारी आणि जवानांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यातील काही अधिकाऱ्यांना प्रतिष्ठेच्या कीर्तीचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून कमाडिंग ऑफिसर्सच्या युद्ध सेवा मेडलने गौरवण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ४ पॅरा कमांडोजचे मेजर रोहित सूरी यांना किर्ती चक्र देऊन गौरवण्यात आले. हा शांतिकाळात दिला जाणारा बहादुरीशी निगडीत दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. मेजर सूरी यांनी एलओसीच्या त्या बाजूला जाऊन करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या एका टीमचं नेतृत्व केलं होतं.

सर्जिकल स्ट्राईकशी निगडीत टॉप सिक्रेट मिशनची योजना करण्यासाठी 9 पॅरा कमांडोजचे कमांडर कर्नल कपिल यादव आणि कर्नल हरप्रीत संधु यांना युद्ध सेवा मेडलने सन्मानित करण्यात आलं. युद्ध सेवा मेडल हे युद्धा दरम्यान विशिष्ट सेवा देणाऱ्यांसाठी दिला जाणार सन्मान आहे. सर्जिक स्ट्राईकला यशस्वी करणऱ्या पॅर बटालियनच्या 5 सैनिकांन शौर्य चक्र तर 13 सैनिकांना शौर्य सेना मेडलने सन्मानित करण्यात आले. तर लेफ्टनंट जनरल प्रवीन बक्षी आणि लेफ्टनंट जनरल पीएम हारिज यांना त्यांच्या सेवेसाठी परम विशिष्ट सेवा मेडल देण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2017 09:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...