गुरुदास कामतांची कोअर कमिटी बैठकीला दांडी

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 25, 2017 04:52 PM IST

गुरुदास कामतांची कोअर कमिटी बैठकीला दांडी

congres

25 जानेवारी : काॅंग्रेस नेते गुरुदास कामत यांची नाराजी अजूनही कायम असून त्यांनी आज मुंबई काॅंग्रेसच्या कोअर कमिटीची बैठकीला दांडी मारली. पक्षाचे निरीक्षक भूपिंदरसिंग हुडा यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.या बैठकीला १७ पैकी १५ जण उपस्थित होते. कामत यांच्या व्यतिरिक्त काॅंग्रेस नेते नसीम खानही या बैठकीला उपस्थित नव्हते. गुरुदास कामत आणि इतर काॅंग्रेस नेत्यांनी मुंबई काॅंग्रेस निरुपम यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावल्याने ही तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.

दरम्यान या बैठकीत एनसीपी आणि समाजवादी पक्ष यांच्याशी आघाडी करायची की नाही, उमेदवारांची निवड याबद्दल साधारण दोन तास चर्चा झाली असल्याची माहिती संजय निरुपम यांनी दिली. तसंच गुरुदास कामत किंवा पक्षातल्या इतर विषयांबद्दल २१ फेब्रुवारीनंतर बोलेन असं निरुपम यांनी सांगितलं. शिवसेना-भाजपचा सामना करणं हे आपलं प्रमुख उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार निरुपम यांनी केला.

काॅंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही मिलिंद देवरा यांनीही सगळे वाद बाजूला ठेवून शिवसेना आणि भाजपशी लढत देणं हेच आमचं उद्दिष्ट आहे, आमच्यात कोणतेही वाद नाहीत, सगळं ठीक आहे असं बैठकीनंतर सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 02:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...