साक्षी मलिक, विराट कोहली, दीपा कर्माकर यांना पद्मश्री

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 25, 2017 04:06 PM IST

साक्षी मलिक, विराट कोहली, दीपा कर्माकर यांना पद्मश्री

padmashree121

25 जानेवारी : देशातला सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची यादी समोर आली आहे. ‘पद्मश्री’च्या यादीत क्रिकेटपटू विराट कोहलीसह कुस्तीपटू साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी अधिकृतरित्या केंद्र सरकारच्या वतीने जाहीर होणार आहे. सध्या फक्त पद्मश्री पुरस्कारांची यादी मिळाली आहे. तर पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांची थोड्याच वेळाच घोषणाही लवकरच केली जाणार आहे.

पद्मश्री पुरस्कारांमध्ये यावेळी क्रीडापटूंचं पारडं जड मानलं जात आहे. त्याबरोबरच  गायिका अनुराधा पौडवाल, गायक कैलास खेर,  शेफ संजीव कपूर, समीक्षक भावना सोमय्या यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे.

पद्मश्री पुरस्कार यादी

Loading...

  • विराट कोहली (क्रिकेट)
  • साक्षी मलिक महिला (कुस्तीपटू)
  • दीपा कर्माकर (जिम्नॅस्ट)
  • श्रीजेश (हॉकी)
  • विकास गौडा (अॅथलिट)
  • भावना सोमय्या (फिल्म समीक्षक)
  • सी. नायर (नर्तक)
  • अनुराधा पौडवाल (गायिका)
  • कैलाश खेर (गायक)
  • संजीव कपूर (शेफ)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...