S M L

जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन; एका जवानांचा मृत्यू, 4 जण बेपत्ता

Samruddha Bhambure | Updated On: Jan 25, 2017 03:29 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन; एका जवानांचा मृत्यू, 4 जण बेपत्ता

25 जानेवारी :  जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये झालेल्या हिमस्खलनात एका जवानांचा मृत्यू झाला असून 4 जवान बेपत्ता झाले आहेत. सोनमर्गमधील आर्मी कॅम्पवर आज (बुधवारी) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली असून घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू केलं आहे. आत्तापर्यंत 6 जवानांची यातून सुखरूप सुटका करण्यात यश आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. सोनमर्गच्या या भागात नेहमीच हिमस्खलन होत असतं. त्याचा अनेकदा भारतीय सैन्यासा फटकाही बसला आहे. सध्या सोनमर्गमध्ये वातावरण अतिशय खराब आहे.


अजूनही आज झालेल्या हिमस्खलनात अनेकजण बर्फाखाली अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 02:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close