25 जानेवारी : मुलीच्या अब्रूपेक्षा मताची अब्रू जास्त आहे, असं वादग्रस्त विधान संयुक्त जनता दलाचे नेते आणि राज्यसभा खासदार शरद यादव यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर राजकीय वर्तुळातूनच नाही तर सोशल मीडियावरूनही सडकून टीका होतेय.
पाटण्यात काल (मंगळवारी) झालेल्या सभेत यादव यांनी ही मुक्ताफळं उधळली होती, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
म्हणायला गेले एक आणि बोलले दुसरंच अशी अवस्था सध्या जेडीयू नेते शरद यादव यांची झाली आहे. मतदान कोणत्याही फेरफाराविना झालं पाहिजे, हा मुद्दा मांडताना यादव महिलांबाबत अपमानजनक बोलून बसले.
मताचं-मतपत्रिकेचं महत्त्व जनतेला पटवून देणं खूप गरजेचं आहे. मुलीची अब्रू गेली, तर फक्त गावाची-गल्लीची अब्रू जाईल, पण एकदा मत विकलं गेलं तर देशाची अब्रू जाईल, भविष्यातील स्वप्नांचा चक्काचूर होईल, असं तारे शरद यादवांनी तोडले आहे.
#WATCH: Senior JDU leader Sharad Yadav says "Beti ki izzat se vote ki izzat badi hai" in Patna (Jan 24th) pic.twitter.com/kvDxZpO2iZ
— ANI (@ANI_news) January 25, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv