राजस्थानमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना नोटबंदीचा धडा

राजस्थानमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना नोटबंदीचा धडा

  • Share this:

Rs-500-and-Rs-1000-Main-Article-1-124 जानेवारी : राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाने नोटबंदी निर्णयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी इयत्ता 12 वी च्या अर्थशास्त्र विषयाच्या पुस्तकात नोटबंदी आणि निश्चलनीकरण या संकल्पनेचा समावेश करण्यात येईल. राजस्थान बोर्डाचे अध्यक्ष बी. एल. चौधरी यांनी ही माहिती दिली.

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर देशात निश्चलनीकरण करून भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर डिजीटल इंडिया आणि कॅशलेस व्यवहार ही संकल्पना तरूणांमध्ये रूजावी यासाठी राजस्थान सरकारने घेतलेला हा निर्णय उल्लेखनीय आहे.

या नव्या संकल्पना  शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तसेच अजमेर येथील विद्यार्थी सेवा केंद्रावर स्वाइप मशिन बसण्यात आले असून विद्यार्थी सर्व व्यवहार आता डिजीटल करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बोर्ड परीक्षेशी संबंधित सर्व शुल्क डिजीटल स्वरूपात आकारण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 24, 2017, 9:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading