S M L

'त्या' फॅनच्या मृत्यू प्रकरणी शाहरुखवर गुन्हा दाखल करा'

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2017 09:28 PM IST

srk in delhi (2)24 जानेवारी : अभिनेता शाहरुख खानला पाहण्यासाठी स्टेशनवर उसळलेल्या गर्दी एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता अॅडव्होकेट आभा सिंग यांनी शाहरुख खानवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये.

रईस सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मुंबई ते दिल्ली  एक्स्प्रेसने प्रवास केला. यावेळी त्याला पाहण्याची चाहत्यांची तोबागर्दी झाली. यात एका एका जणांचा मृत्यू झाला. अॅडव्होकेट आभा सिंग यांनी रेल्वेमंच्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहुन अभिनेता शाहरुख खान आणि रेल्वे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केलीय.

या पत्रानुसार, शाहरुख खान हा बेकायदेशीरपणे रेल्वेस्टेशनवर आपल्या फिल्मचं प्रमोशन करत होता आणि त्याला रेल्वेचे अधिकाऱ्यांनीही हरकत घेतली नाही. ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने प्रवास करतानाच त्याच्या पीआर टीमने प्रत्येक स्टेशनवर गर्दी केली होती. ज्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे वडोदरा पोलिसांना सांगून एफआयआर दाखल करावा ही मागणी आभा सिंग यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 09:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close