S M L

माल्या यांच्या कर्जप्रकरणी आयडीबीआयचे माजी अध्यक्ष अटकेत

Sonali Deshpande | Updated On: Jan 24, 2017 05:11 PM IST

माल्या यांच्या कर्जप्रकरणी आयडीबीआयचे माजी अध्यक्ष अटकेत

Profile Of  Chairman UB Group And Kingfisher Airlines Vijay Mallya

24 जानेवारी : विजय माल्या यांच्या थकित कर्ज प्रकरणी सीबीआयने आयडीबीआयचे माजी अध्यक्ष योगेश अगरवाल, आणि चार माजी अधिकाऱ्यांना अटक केलीय.किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाप्रकरणी या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीय. आयडीबीआयचे माजी उपव्यवस्थापकीय संचालक बी. के. बात्रा यांना याप्रकरणी सोमवारी रात्री अटक करण्यात आली. किंगफिशरचे माजी सीईओ ए. रघुनाथन यांनाही सीबीआयने अटक केलीय.

विजय माल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज दिल्याप्रकरणी किंगफिशर एअरलाइन्सचे 3 अधिकारी आणि आयडीबीआयच्या 3 माजी अधिकाऱ्यांची चौकशीसाठी कोठडीत रवानगी करण्यात आलीय. विजय माल्या यांचं मुंबईतलं घर, बंगळुरूमधला यूबी टॉवर्स यासह 11 ठिकाणी सीबीआयने छापे घातले आणि नंतर ही अटकेची कारवाई झाली.विजय माल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला बेकायदेशीररित्या कर्ज दिल्याचा आरोप आयडीबीआय बँकेवर आहे. विजय माल्या यांची पतमर्यादा संपलेली असतानाही वेगवेगळ्या बँकांनी त्यांना कर्ज दिलं. यामध्येच आयडीबीआयने विजय माल्या यांना कमी व्याजदराने 900 कोटींचं कर्ज दिलं. हे कर्ज देण्याआधी विजय माल्या यांनी किंगफिशर एअरलाइन्स तोट्यात आहे, असं जाहीर केलं होतं. किंगफिशर एअरलाइन्सला 1600 कोटींचा तोटा झाला होता. तरीही विजय माल्या यांना कर्ज देण्यात आलं.

विजय माल्या यांना एसबीआय बँकेनेही 1200 कोटींचं कर्ज दिलंय. नोटबंदीनंतरच्या काळात माल्या यांच्या थकित कर्जावरून बराच वादंग झाला होता. विजय माल्या यांचं कर्ज माफ करण्यात आलेलं नाही, असं स्पष्टीकरण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलं होतं. हे कर्ज वसूल करण्यासाठी विजय माल्या यांच्याविरुद्ध कोर्टात अनेक खटले सुरू आहेत पण ते फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 05:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close