S M L

पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा दिल्यामुळे सुषमा स्वराज यांच्यावर टीका

Sonali Deshpande | Updated On: Jan 24, 2017 03:03 PM IST

पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा दिल्यामुळे सुषमा स्वराज यांच्यावर टीका

24 जानेवारी : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. त्याचमार्गे अनेकजण त्यांची मदत मागतात आणि त्या करतातही. त्यांनी नुकतंच अदनान सिद्दीकी आणि साजल अली या दोन पाकिस्तानी अभिनेत्यांना भारतात येण्यासाठी व्हिजा दिला. ते श्रीदेवीच्या 'मॉम' प्रॉडक्शनसाठी काम करत होते. हिंदू जागरण संघानं मात्र त्यांच्यावर टीकेची झोड उठवलीय.

हिंदू जागरण संघाने मोदी आणि सुषमांना टॅग करत ट्विट केलं ,' मोदीजी, सुषमा फक्त मुस्लिमांनाच व्हिजा देतात. हिंदूंना व्हिजा मिळेपर्यंत त्यांचा छळ केला जातो. हे खूप चुकीचं आहे.'यावर सुषमा यांचं उत्तर बघून नक्कीच त्यांना चपराक बसली असणार. त्यांच्या या उत्तरात त्यांचा हजरजबाबीपणा आणि करारी वृत्ती दिसते. त्या म्हणाल्या, 'माझ्यासाठी भारत आणि भारतीय महत्त्वाचे आहेत. जात ,राज्य , भाषा आणि धर्म माझ्यासाठी महत्त्वाचं नाही.'

सुषमा स्वराज आपल्या सडेतोडपणासाठी प्रसिद्ध आहेतच. याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 12:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close