'जल्लीकट्टू' स्पर्धेनं घेतला 2 जणांचा बळी

  • Share this:

jallikattu (2)23 जानेवारी :  तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूला परवानगी मिळाल्यानंतर या राज्यात जल्लीकट्टूच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या पुडिक्कोट्टाई जिल्ह्यातल्या रापूसल गावात 2 जणांचा मृत्यू ओढवला तर 129 जण जखमी झाले. बैलांशी झुंज खेळताना बैलाने धडका मारल्यामुळे या दोघांचा मृत्यू ओढवला.

बैलावर स्वार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला बैलाने ढुशी मारली आणि त्याच्या पोटात जोरदार मार बसला. जल्लीकट्टूमध्ये जखमी झालेल्या 3 जणांना पुडुक्कोट्टाईच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या स्पर्धकांना कमी मार लागला त्यांना प्रथमोचाराने बरं करण्यात आलं.

जल्लीकट्टूच्या या स्पर्धेला पुड्डुक्कोट्टाई जिल्ह्यात 5 हजार लोक जमले होते.  या स्पर्धेला तामिळनाडूचे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री सी. विजय भास्कर यांनी हिरवा झेंडा दाखवला. ज्या स्पर्धेत इतके लोक जखमी झाले त्या स्पर्धेला आरोग्यमंत्र्यांनीच हिरवा झेंडा दाखवणं हा एक विचित्र योगायोगच म्हणावा लागेल.

तामिळनाडूमध्ये पोंगलच्या निमित्ताने जल्लीकट्टू स्पर्धा खेळवल्या जातात. या स्पर्धांवरची बंदी उठवण्यासाठी चेन्नईच्या मरिना बीचवर मोठं आंदोलन झालं. यानंतर राज्य सरकारने जल्लीकट्टूवरची बंदी उठवण्याचा अध्यादेश काढला. केंद्राने त्याला मान्यता दिली आणि राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. त्यानंतर जल्लीकट्टूवरची बंदी तात्पुरती उठवण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 06:13 PM IST

ताज्या बातम्या