S M L

चेन्नईत जलीकट्टूसाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलीसांचा लाठीचार्ज

Samruddha Bhambure | Updated On: Jan 23, 2017 12:21 PM IST

चेन्नईत जलीकट्टूसाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलीसांचा लाठीचार्ज

23 जानेवारी :  जलीकट्टू या पारंपरिक खेळावरील बंदी हटवण्यात यावी या मागणीसाठी गेल्या आठवड्याभरापासून मरीना बीचवर आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी आज (सोमवारी) सकाळी लाठीचार्ज केला.

Loading...

जलिकट्टूवर घातलेली बंदी तात्पुरत्या स्वरुपात उठवल्यानंतरही चेन्नईत अजूनही निदर्शनं सुरूच आहेत. पण अध्यादेश काढूनही जलिकट्टूचा तिढा कायम आहे. यावर्षी जल्लीकट्टू पार पडलं, पण या खेळावरील बंदीसदंर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच 'पेटा' या प्राणीप्रेमी संघटनेवर बंदी घालावी या मागणीसाठी मरिना बीचवर सलग सातव्या दिवशीही अंदोलन सुरू आहे.

' तुमची मागणी आता मान्य झाली आहे, त्यामुळे आता हा परिसर रिकामा करा' असे आदेश पोलिसांनी आंदोलकांना दिले. मात्र आंदोलकांनी जागेवरून हटण्यास नकार देत पोलिसांनी कारवाई केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने बीचवरील परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान,  मरिना बीचवर जमलेल्या आंदोलकांमध्ये तरुणांचा समावेश मोठ्या प्रमाणात असून यातील अनेक जण उच्चशिक्षित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 11:12 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close