Elec-widget

कोलकाता वनडेत संघर्षपूर्ण लढतीत भारताचा 5 धावांनी पराभव

कोलकाता वनडेत संघर्षपूर्ण लढतीत भारताचा 5 धावांनी पराभव

  • Share this:

258226

22 जानेवारी : कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या वनडेच्या रोमहर्षक सामन्यात भारताचा पाच रन्सनं पराभव झालाय. केदार जाधवच्या 90 धावांची झुंजार खेळी व्यर्थ गेली. इंग्लडनं पहिल्यांदा फलंदाजी करीत 8 गड्यांच्या मोबदल्यात 321 धावा केल्या.

321 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय टीमची खराब सुरुवात झाली. के. एल. राहुल, अजिंक्य राहणे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि युवराज सिंगनं भारताच्या डावाला आकार दिला. मात्र युवराज 45 कोहली 55 धावांवर बाद झाले.

त्यानंतर आलेल्या धोनीने केवळ 25 धावांची भर घालून तंबूचा रस्ता धरला. केदार जाधव आणि हार्दिक पंड्यानं 104 धावांची भागिदारी केली. भारताचा विजय दृष्टीपथात आला असतानाच हार्दिक आणि शेवटच्या षटकातल्या पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2017 10:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com