तामिळी जिंकले, अखेर 'जलीकट्टू'वरचा 'वेसण' सुटला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2017 08:18 PM IST

तामिळी जिंकले, अखेर 'जलीकट्टू'वरचा 'वेसण' सुटला

jalikatu_ban_Free21 जानेवारी : जलीकट्टूसाठी रस्त्यावर उतरलेल्या तामिळी जनतेच्या लढ्याला अखेर यश आलंय. तामिळनाडू सरकारने जलीकट्टूला परवानगी देण्याबाबत काढलेल्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केलीय. त्यामुळे जलीकट्टूवरील बंदी उठण्याचा मार्ग मोकळा झालाय.

आज तामिळनाडूमधील खासदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्याबाबतचं निवेदन दिलं. त्यानंतर राष्ट्रपतींनी परंपरेचा मान ठेवण्यासोबत प्राण्यांना ईजा न पोहचवता हा खेळ खेळायला हरकत नसल्याचं मत व्यक्त करून या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. तामिळनाडूच्या भूमिकेला केंद्र सरकारने दिलेल्या पाठिंब्याबाबत मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तर ही बातमी कळताच मरिना बीचवरील आंदोलनकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

का उतरली जनता रस्त्यावर ?

तामिळनाडूच्या जलीकटू या खेळावर बंदी आणल्यामुळे तामिळ जनता रस्त्यावर उतरलीय. या खेळाला ४ वर्षाचा भव्य असा इतिहास असताना न्यायालयाने या खेळाची नीट चौकशी न करता पेटाच्या मागणीनुसार बंदी घातल्यामुळे तामिळ जनता आक्रमक झाली. हा निर्णय न्यायालयाने जाहीर केल्यानंतर तामिळ जनतेने मुंबई शहरात अनेक ठिकाणी आंदोलने करायला सुरुवात  केलीय. चेन्नईच्या मरिना बीच ते दिल्लीपर्यंत आंदोलकांनी धुराळ उडवला. खेळ बंद केल्यामुळे आक्रमक झालेल्या तामिळ जनतेने हातात फलक घेऊन 'we support jallikattu', 'we want jallikattu' अश्या जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे  सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन आणि ए.आर.रहमान यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. जनतेच्या रेट्यापुढे अखेर केंद्र सरकारला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि जल्लीकट्टूला घातलेला 'वेसण' मागे घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2017 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...