S M L

आरक्षणाचा फायदा झाला नाही,सर्वांना समान संधी द्या; संघाचा पुन्हा सूर

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2017 10:05 PM IST

आरक्षणाचा फायदा झाला नाही,सर्वांना समान संधी द्या; संघाचा पुन्हा सूर

20 जानेवारी : संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाला मुद्यावर वक्तव्य केलंय. आरक्षणाचा इतक्या वर्षांपासून कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे आता आरक्षणावर पुन्हा एकदा विचार झाला पाहिजे. सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे असं वक्तव्यच वैद्य यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.

जयपूरमध्ये लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये झालेल्या चर्चासत्रात मनमोहन वैद्य यांनी आरक्षणावर भाष्य केलं. आरक्षणाचा विषयावर आता नव्याने विचार होणं गरजेचं आहे. आणि हे समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी करणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यानंतर आपला समाज इतका मागास आणि गरीब, अशिक्षित का आहे याचा विचार करावा लागणार आहे असं वैद्य म्हणाले.

एससी आणि एसटीसाठी वेगळे अधिकार देण्यात आले आहे. त्यांना अनेक वर्षांपासून व्यवस्थेपासून त्यांना दूर ठेवण्यात आलं. त्यामुळे त्यांना शक्ति देण्यासाठी आणि समान संधी देण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यात आलीये. डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा जास्त काळ आरक्षण देऊ नये अशी भूमिका मांडली होती असा दाखलाही वैद्य यांनी दिला. माओवादाला प्रोत्साहन देण्याचा विषय असेल तर सर्वांना समान अधिकार एका काळानंतर मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे असंही वैद्य यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, भारत हा नेहमी धर्मनिरपेक्ष देश राहिला आहे. राजाने कधीही धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही. संविधान सभेच्या वेळी सर्वांना या शब्दाबद्दल माहित आहे. त्या लोकांना यावर चर्चा केली आणि अंमलबजावणीही केली.  संविधानात तथाकथित अल्पसंख्याकांना खूप सारे अधिकार दिले आहे. ज्याची फारशी आवश्यकता नव्हती. सगळ्यांना समान अधिकार मिळणे आवश्यक आहे. हिंदूत्वामध्ये आता अशी परंपरा राहिली नाही. सर्वांना समानतेनं वागणूक दिली पाहिजे. त्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळत नाहीये. त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्यावर फेरविचार झाला पाहिजे अशी मागणीच वैद्य यांनी केली.

आपल्या विधानामुळे वाद निर्माण होईल याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. मागास वर्गाला पुढे आणण्यासाठी कुठली व्यवस्था असेल तरी राहिली पाहिजे. पण, आतापर्यंत त्याचा फायदा झाला नसेल तर याचा विचार झाला पाहिजे असंही वैद्य म्हणाले.

वैद्य यांच्या विधानावर लालू प्रसाद यादव यांनी टीका केली. आरक्षण हे राज्य घटनेनुसार दिलेला अधिकार आहे. हा काही संघासारख्या जातीयवादी संघटनेची खैरात नाही अशी खरमरीत टीका लालू प्रसाद यादव यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 10:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close