'जल्लीकट्टू'वरची बंदी उठणार ?

  • Share this:

jallikattu (1)20 जानेवारी : तामिळनाडूमध्ये 'जल्लीकट्टू'वरची बंदी उठणार, अशी चिन्हं आहेत. 'जल्लीकट्टू'वरची बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या वटहुकुमाला केंद्राने मान्यता दिलीय. आता हा वटहुकूम राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे पाठवण्यात येणार आहे. जोपर्यंत 'जल्लीकट्टू'वरची बंदी उठवली जात नाही तोपर्यंत आम्ही मरीना बीचवरून हटणार नाही, असं निदर्शकांनी म्हटलंय.

सुप्रीम कोर्टाने 'जल्लीकट्टू' म्हणजे बैलांशी खेळल्या जाणाऱ्या झुंजीवर बंदी घातलीय. सुप्रीम कोर्टात 'जल्लीकट्टू'बद्दलचा खटला सुरू आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पुढच्या आठवड्यात निकाल न देण्याचं मान्य केलंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे केंद्राने कोर्टाला निकाल न देण्याची विनंती केलीय.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी या वटहुकूमावर सही केली की जल्लीकट्टूवरची बंदी उठू शकते. त्यामुळे रविवारपर्यंत 'जल्लीकट्टू' वरची बंदी उठेल.

जल्लीकट्टू म्हणजे काय ?

- जल्लीकट्टू म्हणजे मस्तवाल बैलाला आटोक्यात आणण्याची शर्यत

- पोंगलच्या निमित्ताने तामिळनाडूत गावांगावांत या स्पर्धा खेळल्या जातात.

- या शर्यतीत एका मस्तवाल बैलाला गावकऱ्यांच्या गर्दीत सोडलं जातं.

- गर्दीतले स्पर्धक या बैलावर स्वार होण्यासाठी जीवाची बाजी लावतात.

- बेफामपणे धावणाऱ्या या बैलाच्या शिंगांना लावलेले झेंडे काढणाऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित केलं जातं.

- तामिळनाडूमध्ये या जल्लिकट्टूची हजारो वर्षांची परंपरा आहे.

- जल्लीकट्टूसाठी इथल्या गावांगावांत खास बैलांची पैदास केली जाते.

- जल्लीकट्टूसाठीच्या बैलाचं पालनपोषण गावातल्या मंदिरात केलं जातं.

- ज्या बैलाला हा बहुमान मिळतो त्याची शुभ दिवसाला पूजाही केली जाते.

- जल्लीकट्टूच्या आधी या बैलाला खायला घालून मस्तवाल बनवलं जातं.

- पोंगलच्या निमित्ताने या बैलाशी झुंज खेळण्यासाठी गावकऱ्यांना आव्हान दिलं जातं आणि मोठमोठी बक्षीसंही जाहीर होतात.

- जल्लीकट्टूच्या स्पर्धानंतर मग हा बैल शेतीच्या कामासाठीही वापरला जातो.

- ज्या बैलावर विजय मिळवता येत नाही अशा बैलाचं महत्त्वही मोठं असतं.

- शेतीच्या कामांसाठी उत्तमोउत्तम बैल मिळावे यासाठीही या सणाचं महत्त्व आहे.

- महाराष्ट्रातही जल्लिकट्टूसारखी बैलगाडा शर्यतींची परंपरा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 08:50 PM IST

ताज्या बातम्या