S M L
Football World Cup 2018

अखिलेश आणि काँग्रेस यांची युती अडली जागावाटपावर

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2017 07:09 PM IST

अखिलेश आणि काँग्रेस यांची युती अडली जागावाटपावर

20 जानेवारी : उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि अजित सिंग यांचं राष्ट्रीय लोकदल यांच्या युतीमुळे भाजपसमोर आव्हान उभं राहिलंय. पण या युतीची घोषणा अजून झालेली नाही.

भाजपला टक्कर देऊ पाहणाऱ्या या तिन्ही पक्षांची युती जागावाटपावर अडून बसलीय. समाजवादी पक्षाने आपली 191 जागांची यादी जाहीर केलीय. या जागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय लोक दलाच्या बालेकिल्ल्यांचा समावेश आहे. त्यामुळे विजयाची खात्री असलेल्या या जागा काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाला हव्या आहेत.

पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर जिल्ह्यातल्या 7 जागा या काँग्रेसची शक्तिस्थानं आहेत. या जागांवर समाजवादी पक्षाला आपले उमेदवार उभे करायचे आहेत.  पश्चिम उत्तर प्रदेशमधल्या या जागांवरून समाजवादी आणि काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत.

राष्ट्रीय लोकदलाने त्यांच्या कोट्यातल्या काही जागा काँग्रेसला द्याव्यात, असं अखिलेश यादव यांनी याआधी म्हटलं होतं. पण राष्ट्रीय लोकदलाची तशी तयारी दिसत नाही. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटल्याशिवाय या युतीची घोषणा होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close