S M L

राजस्थानात घडतेय खरीखुरी 'दंगल'

Sonali Deshpande | Updated On: Jan 20, 2017 12:32 PM IST

राजस्थानात घडतेय खरीखुरी 'दंगल'

20 जानेवारी : राजस्थानमध्ये आमिरच्या 'दंगल' चित्रपटात दाखवल्यासारखं कुटुंब समोर आलंय.राजस्थानच्या भिलवाडी येथील छोटू माली आणि त्यांच्या चारही मुली कुस्ती खेळ अक्षरश:जगतात.सध्याच त्यांच्या दोन मुलींनी राज्यस्तरावरून सुवर्णपदक जिंकून आणलंय.

छोटु माली यांना मनीषा,माया,चंचल,खुशी या चार मुली आहेत.या मुली त्यांचं नाव मोठं करत असल्याने त्यांना मुलगा नसल्याचं दु:खही नाहीये.

करियरच्या सुरुवातीलाच मनीषाने स्टेट सब ज्युनिअर चॅंम्पिअनशिप जिंकली. तिकडेच मायानं अण्डरवेट स्टेट सब ज्युनिअर चॅम्पिअनशिप जिंकली आहे.

छोटू माली व्यवसायाने शेतकरी आहेत.दंगल चित्रपटात ज्याप्रमाणे महावीर फोगाट आपल्या मुलींकडून कठीण परिश्रम करून घेतात, तसंच छोटूसुध्दा त्या मुलींकडून तालीम करून घेतात. त्या मुली रोज पहाटे 4 वाजता उठतात. इतक्या सकाळपासूनच त्यांचा कुस्तीचा व्यायाम सुरू होतो.

त्या मुली म्हणतात,'आम्हालाही आमचे बापू हानीकारक वाटायचे. त्यांचं आम्हाला सकाळी उठवणं,व्यायाम करून घेणं आवडायचं नाही. मात्र आत्ता समजतंय की कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याआधी ही इतकी मेहनत गरजेची होतीच.'

भिलवाडीच्या या चार मुलींचे वडील त्यांच्या तरुणपणात पुरुष कुस्तीपटूंशी स्पर्धा करायचे. कुस्तीच्या आखाड्यात वेगवेगळे डाव-पेच लावून त्यांनी मध्य प्रदेशच्या जावेद येथील 'जावद केसरी' हा किताब त्यांच्या नावी केला. इतकं सगळं चालू असताना त्यांची घरची आर्थिक परिस्थिती कायम गरीब होती.या परिस्थितीमुळे त्यांना त्यांची कुस्ती सोडावी लागली. मात्र नंतर त्यांनी आपल्या मुलींवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांनी त्यांच्या चारही मुलींना कुस्तीचा सराव सुरू केला. देशासाठी मेडल्स आणणं हे त्यांचं आत्ता स्वप्न झालं आहे आणि त्यासाठी त्यांचं संपूर्ण कुटुंब मेहनत घेत आहे.

माली या गावात राहणारे छोटू आणि त्यांची पत्नी मांगी देवी आपल्या चारही मुलींच्या कुस्तीच्या व्यायामाची, सरावाची आणि खुराकाची काळजी घेतात. या मुलींच्या व्यायामात अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्या जमिनीवरून वजन घासत नेतात, हाताने दोऱ्या खेचतात आणि जमीनही खणतात. यानंतर त्या आखाड्यात बसूनच अभ्यास करतात. इतक्या व्यायामानंतर आणि सरावानंतर या चारही बहिणी शाळेत जातात.

यापैकी एक मुलगी मायाचं वजन 30 किलो असलं तरीही तिने 38 किलो वजनी गटात स्टेट सब ज्युनिअर चँम्पिअनशिप जिंकत गोल्ड मेडल मिळवलं.तसंच मायाच्या मोठ्या बहिणीचं मनीषाचंही. ती 49 किलो वजनी गटात स्टेट सब ज्युनियर चॅंम्पियन आहे. या दोन्ही बहिणींचं पुढचं लक्ष्य आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारतासाठी गोल्ड मेडल जिंकणं आहे.

या मुलींचे प्रशिक्षक आणि मेवाड केसरी तजेंद्रन गुर्जर म्हणतात की,'मलाही दोन मुली आहेत, मुलगा नाहीये.आणि या मुली कॉमन वेल्थ गेम्समध्ये देशासाठी गोल्ड मेडल जिंकणाऱ्या फोगट बहिणींपेक्षा कमी नाहीयेत.मला पूर्ण विश्वास आहे की या एक दिवस नक्कीच देशाचं नाव मोठं करतील.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close