19 जानेवारी : उत्तर प्रदेशातील एटामध्ये आज (गुरूवारी) झालेल्या ट्रक आणि स्कूलबसच्या भीषण अपघातात 25 विद्यार्थी ठार झाले असून 30 विद्यार्थी जखमी झाले आहेत. दाट धुक्यामुळे समोरून येणारा ट्रक न दिसल्यानं स्कूल बस ट्रकवर जाऊन आदळली आणि हा अपघातात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जे. एस. विद्या पब्लिक निकेतनची ही बस होती. या बसमध्ये 50 ते 60 विद्यार्थी होते.
विद्यार्थ्यांना शाळेत नेत असताना अलीगंज रोडवर ही बस वाळूनं भरलेल्या ट्रकला जाऊन आदळली. प्रचंड धुक्यामुळं समोरून येणारा ट्रक न दिसल्यानं हा अपघात झाला. या भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला असून 15 विद्यार्थी जागीच दगावले आहेत.
40 जखमींपैकी 20 ते 25 विद्यार्थ्यांना सरकारी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून 15 मुलांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी दुसऱ्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.
प्रशासनाने 20 तारखेपर्यंत उत्तर प्रदेशात शाळांना सुट्टी जाहीर केली होती. तरीही ही शाळा सुरू ठेवण्यात आली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा