'जल्लिकट्टू' म्हणजे काय रे भाऊ...

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2017 07:30 PM IST

'जल्लिकट्टू' म्हणजे काय रे भाऊ...

[wzslider] 18 जानेवारी : तामिळनाडूतला पारंपरिक खेळ जल्लिकट्टूला वाचवण्यासाठी तिथं मोठं आंदोलन सुरू झालंय. जल्लिकट्टूवर निर्बंध आणणाऱ्या पिटाविरोधात तिथं संतप्त वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्रातही लोकप्रिय असलेल्या बैलगाडी शर्यतींचा धुरळा बंदीमुळे खाली बसलाय.

जल्लिकट्टू म्हणजे काय ?

- जल्लिकट्टू म्हणजे मस्तवाल बैलाला आटोक्यात आणण्याची शर्यत

- पोंगलच्या निमित्ताने तामिळनाडूत गावांगावांत या स्पर्धा खेळल्या जातात.

- या शर्यतीत एका मस्तवाल बैलाला गावकऱ्यांच्या गर्दीत सोडलं जातं.

Loading...

- गर्दीतले स्पर्धक या बैलावर स्वार होण्यासाठी जीवाची बाजी लावतात.

- बेफामपणे धावणाऱ्या या बैलाच्या शिंगांना लावलेले झेंडे काढणाऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित केलं जातं.

- तामिळनाडूमध्ये या जल्लिकट्टूची हजारो वर्षांची परंपरा आहे.

- जल्लिकट्टूसाठी इथल्या गावांगावांत खास बैलांची पैदास केली जाते.

- जल्लिकट्टूसाठीच्या बैलाचं पालनपोषण गावातल्या मंदिरात केलं जातं.

- ज्या बैलाला हा बहुमान मिळतो त्याची शुभ दिवसाला पूजाही केली जाते.

- जल्लिकट्टूच्या आधी या बैलाला खायला घालून मस्तवाल बनवलं जातं.

- पोंगलच्या निमित्ताने या बैलाशी झुंज खेळण्यासाठी गावकऱ्यांना आव्हान दिलं जातं आणि मोठमोठी बक्षीसंही जाहीर होतात.

- जल्लिकट्टूच्या स्पर्धानंतर मग हा बैल शेतीच्या कामासाठीही वापरला जातो.

- ज्या बैलावर विजय मिळवता येत नाही अशा बैलाचं महत्त्वही मोठं असतं.

- शेतीच्या कामांसाठी उत्तमोउत्तम बैल मिळावे यासाठीही या सणाचं महत्त्व आहे.

- महाराष्ट्रातही जल्लिकट्टूसारखी बैलगाडा शर्यतींची परंपरा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...