तामिळनाडूमध्ये 'जल्लिकट्टू'साठी समर्थकांची 'झुंज'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2017 05:55 PM IST

तामिळनाडूमध्ये 'जल्लिकट्टू'साठी समर्थकांची 'झुंज'

 jallikattu_protest18 जानेवारी :  जल्लिकट्टू म्हणजेच बैलांशी खेळल्या जाणाऱ्या झुंजीला परवानगी द्यावी यासाठी तामिळनाडूमध्ये निदर्शनं होतायत. याच मागणासाठी चेन्नईच्या मरिना बीचवरही निदर्शनं सुरू आहेत. जल्लिकट्टूला परवानगी द्या या मागणीसाठी हजारो निदर्शक मरिना बीचवर जमलेत. जल्लिकट्टूवरची बंदी उठवा आणि पेटा या प्राणीप्रेमी संघटनेवरच बंदी घाला, अशी मागणी त्यांनी केलीय.

तामिळनाडूमध्ये जल्लिकट्टूची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. त्यामुळे तामिळनाडूची ही संस्कृती जपली जावी, अशी निदर्शकांची मागणी आहे. तामिळनाडूमध्ये जल्लिकट्टू हा खेळ काही हजार वर्षांपासून खेळला जातो हेही या निदर्शकांनी लक्षात आणून दिलंय.

जल्लिकट्टूच्या स्पर्धांमध्ये बैलाशी झुंज लावणारे लोक जखमी झाल्याच्या घटना घडल्यायत. त्यासोबतच या खेळात प्राण्यांवर अत्याचार होतात, त्यामुळे या खेळावर बंदी घाला, अशी याचिका 'पेटा' या प्राणीप्रेमी संघटनेने याविरोधात याचिका दाखल केली होती. यानंतर सुप्रीम कोर्टाने प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार जल्लिकट्टूच्या स्पर्धांवर बंदी घातली.

महाराष्ट्रातही जल्लिकट्टूप्रमाणेच बैलगाडा शर्यतींची परंपरा आहे. पश्चिम महाराष्ट्रात खास करून पुणे, जुन्नरमध्ये बैलगाडा शर्यती लावल्या जातात. या बैलगाडा शर्यतींवरही प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार

बंदी घालण्यात आलीय. आता जल्लिकट्टूप्रमाणेच बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवा, अशी मागणी महाराष्ट्रात जोर धरतेय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...