S M L

नोटाबंदीविरोधात काँग्रेसचं आंदोलन,सुशीलकुमार शिंदेंना घेतलं ताब्यात

Sonali Deshpande | Updated On: Jan 18, 2017 02:53 PM IST

नोटाबंदीविरोधात काँग्रेसचं आंदोलन,सुशीलकुमार शिंदेंना घेतलं ताब्यात

18 जानेवारी : नोटाबंदीविरोधात काँग्रेसनं आज देशभरात आंदोलन छेडलंय. अहमदाबाद इथल्या आर बी आय कार्यालयांवर आंदोलन करताना माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.त्याचबरोबर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं.

नागपूर इथे आरबीआय कार्यालयासमोर निदर्शनं करताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. हे कार्यकर्ते आरबीआयच्या गेटवर चढले आणि त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ' यापूर्वी देशात कधीही रिझर्व्ह बॅंकेवर लोकांनी निदर्शनं केली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय तुघलकी आहे.देशातील सर्व काळा पैसा नरेंद्र मोदींच्या एका नोट बंदीच्या निर्णयामुळे पांढरा झालाय.'

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 02:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close