सलमान खान निर्दोष, जोधपूर कोर्टाचा निर्णय

सलमान खान निर्दोष, जोधपूर कोर्टाचा निर्णय

  • Share this:

Salman freewqassafa

18 जानेवारी :  काळवीट शिकार प्रकरणात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर सेशन्स कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे. त्यामुळे सलमानला मोठा दिलासा मिळाला आहे.

1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान कंकणीजवळ सलमान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप होता. मात्र त्याने या शस्त्रांनी 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 रोजी काळवीटांची शिकार केली, असा आरोप याचिकाकर्त्याने केला होता.

दरम्यान सलमानची ही शस्त्र चोरी गेली अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये शस्त्र आढळली, असेही याचिकाकर्त्याने नमूद केले होते. शिवाय काळवीटांचा मृत्यू गोळी लागूनच झाल्याचा शवविच्छेदन अहवालही याचिकाकर्त्याने कोर्टासमोर सादर केला आहे. मात्र, 5 दिवसांनी त्याची जामीनावर सुटका झाली होती.

2006 मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर इथल्या भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर देखील दोन काळविटाची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. काळवीटची शिकार करणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे आणि शस्त्रास्त्रांचा गैरवापर अशा विविध कलमांखाली सलमान खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने त्याला दिलासा दिला असून, याप्रकरणात त्याला दोषमुक्त केलं आहे.

काय आहे सलमान प्रकरण?

  • ऑक्टोबर 1998- राजस्थान राज्य वन विभागाने शस्त्रास्त्र उल्लंघन कायद्यांतर्गत खटला दाखल केला
  • परवाना संपला असतानाही शस्त्र बाळगून काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी खटला दाखल
  • 2006 मध्ये पहिल्यांदा सलमान खानला दोन्ही शिकार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले
  • सलमानला एक आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली
  • याविरोधात सलमानने अपील केले आणि 2016 मध्ये त्याची राजस्थान उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली
  • ऑक्टोबर 2016 मध्ये राजस्थान सरकरानं त्याच्या सुटकेविरोधात याचिका दाखल केली होती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 18, 2017, 10:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading