S M L

संपूर्ण देश जायरा वसीमच्या पाठीशी

Sonali Deshpande | Updated On: Jan 17, 2017 01:35 PM IST

संपूर्ण देश जायरा वसीमच्या पाठीशी

17 जानेवारी : 'दंगल'फेम जायरानं जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुक्ती यांची भेट घेतल्यावर सोशल मीडियावर भरपूर गदारोळ झाला. तिच्यावर बरीच टीका झाली आणि तिनं याबद्दल माफीही मागितली. पण आमिर खान, जावेद अख्तर, स्वतः गीता फोगाट, कुस्तीपटू सुशील कुमार, काँग्रेस नेते शशी थरूर या सर्वांनी झायराला पाठिंबा दर्शवलाय.

जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींना भेटल्यामुळे जायरावर ट्विटरवर काही स्तरातून सडकून टीका झाली होती.त्यानंतर जायरावर माफी मागायची वेळ आली.पण आता सोशल मीडियावर तिला जाहीर पाठिंबा मिळतोय.


आमिर खाननं यावर काय म्हटलंय,'मी जायराचं निवेदन वाचलं. तिनं असं का म्हटलं याची मी कल्पना करू शकतो. झायरा, मला तुला सांगायचंय की आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुझ्यासारखी लहान मुलं फक्त भारतातल्या नाही तर जगभरातल्या लहान मुलांसाठी आदर्श आहात. माझ्यासाठी तू नक्कीच आदर्श आहेस. झायराला आता एकटं सोडा असं मी सर्वांना आवाहन करतो. ती फक्त 16 वर्षांची आहे आणि या सगळ्याला कसं सामोरं जायचं हा तिच्यापुढचा प्रश्न आहे.

जावेद अख्तर यांनी काय म्हटलंय,'जे लोक आजादी आजादी म्हणून आरडाओरडा करतात, ते इतरांना थोडीही आजादी देत नाहीत. बिचारी जायरा. तिला तिच्या यशाबद्दलही माफी मागावी लागली.'

जिची भूमिका जायरानं केली, त्या गीता फोगाटनंही जायराला पाठिंबा दिलाय. "आमिर जे म्हणाला ते बरोबर आहे. ती लहान असली तरी ती तरुणांसाठी आदर्श आहे. खास करून काश्मीरच्या तरुणांसाठी. तिला अधिक पाठिंबा मिळायला हवा. जायरा, तू कशाचीही भीती बाळगू नकोस."

Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close