एमडीएचच्या आजोबांनी पटकावला 'सर्वात श्रीमंत सीईओ'चा मान

एमडीएचच्या आजोबांनी पटकावला 'सर्वात श्रीमंत सीईओ'चा मान

  • Share this:

mahashay-dharampal-chairman-mdh-masala-received-59260

17 जानेवारी : लाल मिरची पावडरपासून ते सांबार मसाल्यापर्यंत.. प्रत्येक स्वयंपाकघरात वर्षोनवर्षे हक्काने विराजमान झालेले एमडीएच मसाले सर्वांच्याच परियचाचे. त्याच मसाल्याच्या पॅकेटवर तुम्ही फेटावाल्या आजोबांचं चित्र पाहिलंच असेल ना?... किंवा मग टीव्हीवरच्या एमडीएचच्या जाहिरातीतील पीळदार मिशीवाले 'दादाजी' नक्कीच बघितले असतील?... 94 वर्षांच्या आजोबांनी बड्या बड्या उद्योगपतींना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला आहे.

विशेष म्हणजे, 94 वर्षांच्या या आजोबांनी या रेसमध्ये  गोदरेज कन्झ्युमरचे सीईओ आदि गोदरेज आणि विवेक गंभीर, हिंदुस्थान युनिलिव्हरचे संजीव मेहता आणि आयटीसीचे वाय सी देवेश्वर यांची कमाईही गुलाटी यांच्यापेक्षा कमी आहे.

'महाशियां दी हट्टी' ही कंपनी 'एमडीएच' या नावाने प्रसिद्ध आहे. एमडीएच कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या या आजोबांचं नाव आहे, धरमपाल गुलाटी. फक्त पाचवीपर्यंत शिकलेल्या गुलाटी यांच्याकडे एमडीएच कंपनीच्या एकूण समभागांपैकी 80 टक्के हिस्सा आहे. 94व्या वर्षीही ते अगदी न चुकता कारखान्यात, बाजारात जातात आणि डीलर्सनाही भेटतात, अगदी रविवारीही.

या कंपनीची  924 कोटी वार्षिक कमाई आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात २१३ कोटी रुपयांचा नफा कमावला असून 21 कोटी रुपये कंपनीचे सीईओ असलेल्या 'आजोबां'च्या खात्यात जमा झालेत.

धरमपाल गुलाटी यांच्या सहा दशकांच्या अथक प्रयत्नांमुळे आज एमडीएचनं मसाल्याच्या बाजारात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यासोबतच २० शाळा आणि एक हॉस्पिटल उभारून त्यांनी सामाजिक जाणिवेचंही दर्शन घडवलं आहे. विशेष म्हणजे, धरमपाल गुलाटी हे आपल्या पगारातील 90 टक्के रक्कम दान करतात.

धरमपाल गुलाटी; सीईओ, एमडीएच मसाले

  • जन्म : 27 मार्च 1923
  • जन्म ठिकाण : सियालकोट, पाकिस्तान
  • शिक्षण : चौथी पास
  • फाळणीनंतर नवी दिल्लीत स्थायिक
  • एमडीएच मसाले कंपनी वाढवली
  • 60 पेक्षा जास्त उत्पादनं
  • 100 पेक्षा जास्त देशांत निर्यात
  • वर्षाचा पगार 21 कोटी
  • 90 टक्के पगार सामाजिक कामांसाठी खर्च

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 11:04 AM IST

ताज्या बातम्या