1 जुलैपासून GST लागू होणार !

 1 जुलैपासून GST लागू होणार  !

  • Share this:

GST Bill16 जानेवारी : जीएसटी कायद्याची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून होणार आहे, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच जाहीर केलंय. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स विधेयकानुसार, पूर्ण देशभरात एकच करप्रणाली असणार आहे. त्यामुळे कररचनेत सुसूत्रता येईल. सध्या अस्तित्वात असलेले वेगवेगळ्या प्रकारचे अप्रत्यक्ष कर यामुळे रद्द होणार आहेत.

दिल्लीमध्ये जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली. जीएसटीनुसार जमणाऱ्या दीड कोटी रुपयांच्या उत्त्पन्नावर राज्यांचा 90 टक्के अधिकार राहील तर केंद्र सरकारचा 10 टक्के अधिकार असेल.  कोणत्या वस्तूंवर किती कर आकारायचा याबाबत केंद्र आणि राज्याची समिती एकत्रितरित्या निर्णय घेईल.

आधी हा कायदा राज्यातल्या महापालिकांमध्ये मंजूर होईल आणि तो पुन्हा एकदा केंद्राकडे येईल. त्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. उद्योजकांना कायद्यातल्या तरतुदी नीट समजाव्यात यासाठी एप्रिलऐवजी जुलै महिन्यात जीएसटी लागू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 16, 2017, 7:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading