अखेर अखिलेशनी मुलायम सिंहांना 'सायकल'वरुन उतरवलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2017 10:41 PM IST

अखेर अखिलेशनी मुलायम सिंहांना 'सायकल'वरुन उतरवलं

akhilesh_yadav_cycle16 जानेवारी :  समाजवादी पक्षाची सायकल अखेर अखिलेश यादव यांनाच मिळालीय. सायकल चिन्ह आपल्याकडेच राहावं म्हणून   मुलायमसिंह यादव जोरदार प्रयत्न करत होते. पण निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या गटाला सायकल चिन्हासाठी मान्यता दिलीय. अखिलेश यादव हेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत, असं निवडणूक आयोगाने म्हटलंय.

उत्तर प्रदेशातल्या महाभारताचा पुढचा अंक आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय. मुलायमसिंह यादव आता नेमकं काय पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याचबरोबर अखिलेश यादव काँग्रेससोबत जाणार का ? याचीही जोरदार चर्चा आहे. अखिलेश यांचा समाजवादी पक्ष काँग्रेस आणि अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदलाशी युती करेल, असे संकेत अखिलेश यादव यांचे समर्थक रामगोपाल यादव यांनी दिलेत.

दरम्यान, अखिलेश विरोधकांसोबत बोलणी करतायत, अखिलेशमुळे उत्तर प्रदेशातले मुस्लीम मतदार समाजवादी पक्षाच्या विरोधात जातायत, असा आरोप मुलायमयसिंह यादव यांनी आधीच केलाय. मी अखिलेशला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्याच्या चुका कळत नाहीयेत, असं मुलायमसिंह म्हणाले.

शिवपाल यादव आणि अमरसिंग यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यावरून समजावादी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अखिलेश यांच्या गटातल्या नेत्यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 07:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...