आता एटीएममधून 10 हजार रुपये काढू शकता

आता एटीएममधून 10 हजार रुपये काढू शकता

  • Share this:

atm_new_Cash16 जानेवारी : नोटबंदीची मुदत संपल्यानंतर आता एटीएममधून 10 हजार रुपये काढता येणार आहे. रिझर्व्ह बँकेनं साडेचार हजारांची मर्यादा शिथील केली आहे.

8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. नोटबंदीच्या या निर्णयानंतर बँक खात्यांवर काही मर्यादा घालण्यात आल्या होता. एटीएममधून सुरुवातीला 2 हजार रुपये काढण्याची मर्यादा घालण्यात आली होती. त्यानंतर ही मर्यादा अडीच हजार करण्यात आली होती.

नोटबंदीची मुदत संपल्यानंतर हीच मर्यादा साडेचार हजारांवर नेण्यात आली. आता रिझर्व्ह बँकेनं पुन्हा एकदा मर्यादा वाढवली असून आता तुम्हाला एटीएममधून दर दिवशी 10 हजार रुपये काढता येणार आहे. जर तुमचं चालू खाते असले तर तुम्हाला एक लाख रुपये काढता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 16, 2017, 5:49 PM IST

ताज्या बातम्या