S M L

मुलायम आणि अखिलेश वेगवेगळे लढणार ?

Samruddha Bhambure | Updated On: Jan 16, 2017 02:51 PM IST

मुलायम आणि अखिलेश वेगवेगळे लढणार ?

16 जानेवारी : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव हे दोघंजण वेगवेगळे लढणार, अशी चिन्हं आहेत. खुद्द मुलायमसिंह यादव यांनीच हे संकेत दिलेत. मुलायमसिंह यादव यांनी लखनौमध्ये पत्रकारांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

मला समाजवादी पक्ष आणि सायकल वाचवायची आहे, गरज पडली तर मी अखिलेशविरोधातही लढेन, असं मुलायमसिंह यादव म्हणाले. वेगळे लढलो तर मला तुमची साथ लागेल, असं भावनिक आवाहनही त्यांनी जनतेला केलं.


अखिलेश विरोधकांसोबत बोलणी करतायत, अखिलेशमुळे उत्तर प्रदेशातले मुस्लीम मतदार समाजवादी पक्षाच्या विरोधात जातायत, असा आरोप मुलायमयसिंह यांनी केला.

मी अखिलेशला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्याच्या चुका कळत नाहीयेत, असं मुलायमसिंह म्हणाले. अखिलेश यादव हे काँग्रेस आणि अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे.

शिवपाल यादव आणि अमरसिंग यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यावरून समजावादी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अखिलेश यांच्या गटातल्या नेत्यांनी केला आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 02:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close