S M L

12 वर्षांत 500 मुलींचं लैंगिक शोषण करणारा नराधम गजाआड

Samruddha Bhambure | Updated On: Jan 16, 2017 12:47 PM IST

vadala_rape_case

16 जानेवारी : लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या रोज येतात पण त्याचं प्रमाण किती भयानक आहे याचा प्रत्यय दिल्लीची बातमी बघितल्यावर येईल.  शाळेतून घराकडे जाणाऱ्या मुलींना अडवून त्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेल्या १२ वर्षात एक-दोन नव्हे तर तब्बल 500 मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक कबूली दिली.

सुनिल रस्तोगी असं ह्या टेलरचं नाव आहे.  त्यानं या १२ वर्षात दिल्लीसह गाजियाबाद आणि रुद्रपूर परिसरात हे गुन्हे केले आहेत. लैंगिक शोषणासाठी हा नरामधम शाळेतील विद्यार्थीनींना टार्गेट करायचा.


'तुमच्या मम्मी-पप्पांनी चॉकलेट पाठवलं आहे', असं सांगून तो या मुलींना निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा.

सुनिलनं आतापर्यंत जवळपास अडीच हजार मुलांच्या शोषणाचा प्रयत्न केला आहे. एका मुलीनं सीसीटीव्ही फुटेजवरून त्याला ओळखलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 12:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close