'त्या' फोटोमुळे मोदीही नाराज, पंतप्रधान कार्यालयाने मागवला खुलासा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2017 11:54 AM IST

'त्या' फोटोमुळे मोदीही नाराज, पंतप्रधान कार्यालयाने मागवला खुलासा

Khadi MODI angry

16 जानेवारी : खादी ग्रामोद्योगच्या यंदाच्या कॅलेंडर आणि डायऱ्यांवर, कुठलीही परवानगी न घेता, महात्मा गांधींऐवजी आपला फोटो छापणं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही खटकलं आहे. खुद्द मोदींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर, पंतप्रधान कार्यालयानं खादी ग्रामोद्योग आयोगाकडून याबाबतचा खुलासा मागवल्याचं सूत्रांकडून समजतं.

या वर्षीच्या खादी ग्रामोद्योगाच्या  कॅलेंडर आणि डायऱ्यांवर महात्मा गांधींचे चरख्यावर सूत कातत असलेलं फोटो हटवून त्या जागी मोदींचा फोटो झळकला. यावरुन विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधीच मिळाली. मात्र या प्रकारावर पंतप्रधान कार्यालयाने नाराजी दर्शवली असून याबाबतचा संबंधीत विभागाकडून खुलासाही मागवला आहे.

पंतप्रधानांना खुश करण्यासाठी किंवा त्यांच्याशी जवळीक असल्याचं भासवण्यासाठी असे प्रकार केले जातात. मात्र, खादी ग्रामोद्योग आयोगाच्या फोटोमुळे स्वतः मोदीच नाराज असल्यानं, या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांना 'कारणे दाखवा' नोटीस पाठवण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयातील सूत्राने सांगितलं.

लुधियानामध्ये काही महिन्यांपूर्वी  मोदींनी महिलांना ५०० चरखे वाटले होते. तेव्हाचा हा फोटो आहे. त्या कार्यक्रमाची आठवण म्हणून फोटो वापरल्याचं आता खादी विभागाकडून सांगण्यात येतंय. पंतप्रधान मोदी हे लोकप्रिय नेते आणि खादीचे पुरस्कर्ते असल्यानंच त्यांचा फोटो यावर्षी छापण्यात आला, अशी बाजू आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मांडली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून खादीचा खप ३४ टक्कयांनी वाढला आहे. हा आकडा आधी २ ते ५ टक्के होता, असंही खादी विभागाचे अधिकारी म्हणाले. पण हे प्रकरण या अधिकाऱ्यांवर चांगलंच शेकणार असं दिसतंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 11:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...