पहलगाममध्ये लष्कराकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

  • Share this:

ceasefire

16 जानेवारी : जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात लष्कराने आज (सोमवारी) पहाटे केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. रविवार रात्रीपासून ही चकमक सुरू होती.

हिजबूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे हे तीन दहशतवादी होते. त्यांच्याकडून तिन एके-47 रायफल्सही जप्त करण्यात आल्या असून परिसरात सैन्यातर्फे अजूनही शोधमोहीम सुरु आहे.

पहलगाममधीर अवूरा गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळताच संरक्षण दलाने या भागात शोध मोहिम हाती घेतली होती, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ही शोध मोहिम सुरू होताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्याला सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं.

यापूर्वी 6 जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या बुडगाम जिल्ह्यात माचू भागात अल-बद्र संघटनेचा अतिरेकी मुझफ्फर अहमद लष्कराच्या चकमकीत ठार झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 09:44 AM IST

ताज्या बातम्या