पटनामध्ये गंगा नदीत बोट उलटली; 21 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2017 10:53 PM IST

पटनामध्ये गंगा नदीत बोट उलटली; 21 जणांचा मृत्यू

asdasdasy

14 जानेवारी :  पटनामध्ये गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 21 जणांना मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचं काम एनडीआरएफ आणि पोलिसांची टीम करत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading...

पटना जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या पतंग महोत्सवात भाग घेऊन परतत असताना ही घटना घडली. बोटीत एकुण 40 प्रवासी होते. यापैकी केवळ 8 जणांनाच वाचवण्यात यश आलं आहे. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यानं ही घटना घडल्याचं सांगण्यात येतं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या वारसांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, रात्र झाल्यानं काळोखामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. मात्र एनडीआरएफ टीमचे जवान बुडालेल्यांचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2017 10:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...