... नोटांवरून बापूंचा फोटो हटवला तर बरंच होईल - तुषार गांधी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2017 07:52 PM IST

... नोटांवरून बापूंचा फोटो हटवला तर बरंच होईल - तुषार गांधी

tushar gandhi12

14 जानेवारी :  'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे ब्रॅण्ड आहेत आणि भाजप सरकारच्या कार्यकाळात नोटांवरून हळूहळू गांधींचा फोटो हटवला जाईल,' असं वादग्रस्त वक्तव्य करणारे हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांना त्यांचं नाव न घेता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. 'भ्रष्ट राजकारणी नोटांचा वापर भ्रष्टाचारासाठी करतात. त्यामुळे नोटांवरून बापूंचा फोटो हटवला तर बरंच होईल', असा टोला तुषार गांधी यांनी लगावला आहे.

Loading...

खादी आणि ग्रमोद्योग आयोगाच्या कॅलेंडरवरून महात्मा गांधी यांचा फोटो हटवून त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आयोगाच्या या कारभारावर टीका होत असतानाच हरयाणाचे एक ज्येष्ठ मंत्री अनिल वीज यांनी गांधी यांच्यापेक्षा मोदीच मोठे ब्रॅण्ड असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या शिवाय गांधींमुळे खादीची दुर्दशा झाली आणि खादीशी गांधींचं नाव जोडल्यापासून हा व्यवसाय डबघाईला आल्याचा तर्कटही त्यांनी मांडलं.

अनिल वीज यांच्या विधानावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठल्यावर भाजपनं ते वीज यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण वाद काही थांबलेला नाही. तुषार गांधी यांनीही काही राजकारणी भ्रष्टाचारासाठी नोटांचा वापर करत असल्यानं या नोटांवरून बापूंचा फोटो हटवला तर चांगलच होईल, असा टोला लागावत या वादावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2017 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...