S M L

खादी ग्रामउद्योगच्या दिनदर्शिकेवरून 'बापू' गायब, मोदींवर टीकेची झोड

Samruddha Bhambure | Updated On: Jan 13, 2017 10:55 PM IST

खादी ग्रामउद्योगच्या दिनदर्शिकेवरून 'बापू' गायब, मोदींवर टीकेची झोड

13 जानेवारी :  खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या 2017च्या कॅलेंडर आणि डायरीवर चरखा चालवणारे महात्मा गांधी यांच्याऐवजी चक्क यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आला आहे. तो देखील चरखा चालवतानाच्या पोजमध्ये. मोदींच्या या चरखा पोज फोटोमुळे मोठं वादंग निर्माण झालं आहे. विरोधकांसोबतच भाजपच्या मित्रपक्षांनीही या कृतीचा जाहीर निषेध केला आहे.

चरखा चालवतानाचा हा मोदींचा फोटो खरंतर ऑक्टोबर महिन्यातील आहे. गरिब महिलांना चरखा वाटप करताना त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळासाठी ही पोज दिली होती. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण हाच फोटो थेट खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या कॅलेडरवर झळकलाय तो देखील दस्तुरखुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधींना हटवून. म्हणूनच देशभरातल्या गांधीवाद्यांनी मोठा संताप व्यक्त केलाय. गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी देखील या कृत्याबद्दल दु:ख व्यक्त केलंय. फक्त विरोधकच नाहीतर भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनंही मोदींच्या या चरखा फोटोचा निषेध व्यक्त केलाय. मोदी हे चरखाचोर असल्याची तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.Loading...

सोशल मीडियातूनही मोदींवर टीकेचा भडीमार होत आहे. मोदी चरखा चोर या नावाने ट्विटरवर सध्या जोरात ट्रेंडिंग सुरू आहे. एवढ्या सगळ्यावादानंतरही भाजपने मात्र, या फोटोचं जाहीरपणे समर्थन केलंय. खादीच्या प्रसारासाठीच हा फोटो छापण्यात आल्याचं भाजप प्रवक्ते संदीप पत्रा यांनी म्हटलं आहे.

खरंतर महात्मा गांधींप्रमाणेच चरखा चालवतानाच्या पोज काढणारे मोदी हे काही मोदीच एकटेच नेते नाहीत. यापूर्वी अगदी सोनिया गांधींपासून अरविंद केजरीवालांपर्यंत सर्वांनीच हे असे फोटो काढून घेतले आहेत. पण मोदींनी थेट खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या कॅलेंडरवरचा बापूंचा फोटो हटवून तिथं स्व:तची छबी झळकवल्याने हा सगळा वाद उद्भवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2017 10:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close