अखनूर हल्ला हा सर्जिकल स्ट्राईक - हाफीज सईदने ओकली गरळ

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2017 09:35 PM IST

अखनूर हल्ला हा सर्जिकल स्ट्राईक - हाफीज सईदने ओकली गरळ

19da379d-fe38-42b6-98d7-886a41425b45_1484293214

13 जानेवारी :  'जमात-उद- दावा' चा म्होरक्या हाफीज सईदने काश्मीरमधल्या अखनूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल मुक्ताफळं उधळलीयत. भारताच्या जम्मू भागातल्या लष्करी छावणीवर चार जणांनी 'सर्जिकल स्ट्राईक' केला, असं हाफीज सईदचं म्हणणं आहे. या चारही जणांना जराही खरचटलंही नाही, असं हाफीज सईद म्हणाला. पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबादमध्ये जमात उद दावाच्या कार्यकर्त्यांसमोर हाफीज सईदने हे वक्तव्य केलंय.

हाफीज सईद काहीही दावा करत असला तरी या भारतीय लष्कराने मात्र या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या 3 मजुरांचा मृत्यू ओढवला, असं म्हटलंय.  हे तिघेजण जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्समध्ये काम करत होते. जम्मूजवळ अखनूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर सोमवारी हा हल्ला झाला होता.

जम्मू भागातल्या लष्करी छावणीवर हल्ला करून या 4 जणांनी हल्ला केला आणि 30 जवानांना ठार केलं, असा दावा हाफीज सईदने केलाय. या हल्ल्यात लष्कराची पूर्ण छावणीच उद्ध्वस्त झाली, असं हाफीज सईदचं म्हणणं आहे. भारताच्या ताब्यातून काश्मीर मुक्त करण्यासाठी 'जिहाद' हाच एक मार्ग आहे, अशी गरळही त्याने ओकलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2017 09:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...