नवज्योतसिंग सिध्दू,ना घरचे ना दारचे!

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2017 02:52 PM IST

नवज्योतसिंग सिध्दू,ना घरचे ना दारचे!

M_Id_375515_Navjot_Singh_Sindhu

13 जानेवारी, कौस्तुभ फलटणकर : राजकारणात आणि क्रिकेटमध्ये दोन गोष्टी समान आहेत, टाईमिंग आणि फूटवर्क . क्रिकेटमध्ये शेरी पा म्हणजेच नवज्योतसिंग सिध्दूला हे चांगलंच जमलं . त्यामुळे राजकारणात सुद्धा आपलं चांगलं जमेल या आशेनी सिध्दू राजकारणात आले .भाजपच्या तंबूतून १२ वर्ष खेळताना सिध्दूने राजकारणाच्या पीचवर आपला जम बसवला. पण षटकार मारण्यासाठी क्रीज सोडण्याची क्रिकेटमधली सवय सिध्दूला राजकारणात नडली .

या वेळी सिध्दूचं ना टाईमिंग जमलं ना फुटवर्क.त्यामुळेच मुख्यमंत्री होता होता आता फक्त आमदार बनून राहू की काय ही भीती सिध्दूला वाटते आहे.पंजाबमध्ये आपण अफाट लोकप्रिय आहोत आणि आपल्याला मुख्यमंत्रीपदाचं उमेदवार केलं तर एकहाती विजय खेचून आणतो,हे गेली दीड वर्ष भाजप नेतृत्वाला सांगण्याचा प्रयत्न करीत होता.पण जेटली- बादल यांच्याशी आधीपासूनच पंगे घेऊन ठेवलेले असल्याने दोघानींही सिध्दूचा पद्धतशीर गेम केला.पंजाबपासून दूर राहण्याच्या अटीवर सिध्दूची राज्यसभेवर नियुक्ती झाली.

आपण पंजाबचे मुख्यमंत्री होऊ शकतो हा प्रचंड आत्मविश्वास असल्याने सिध्दूने कुठल्याही पूर्व तयारी किंवा प्लॅनिंगशिवाय सप्टेंबर महिन्यात भाजप आणि राज्यसभेचा राजीनामा दिला.पंजाबमध्ये सत्ता बळकावायला आतुर असलेला आम आदमी पक्ष आपली लोकप्रियता बघून सहज आपल्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करेल हा सिध्दूचा होरा होता. भाजप सोडल्यावर सिध्दूनं आपशी बोलणी सुरू केली. आपने सुरुवातीला सिध्दूमध्ये इंटरेस्ट दाखवला पण सिध्दूची मुख्यमंत्री पदाची मागणी फेटाळली. त्या ऐवजी केजरीवाल सिध्दूला उप मुख्यमंत्री पद द्यायला तयार झाले.

त्याच वेळी सिध्दूने मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. केजरीवाल यांना हे कळल्याबरोबर त्यांनी सिध्दूला एंटरटेन करणं बंद केलं.तरीही आपल्या लोकप्रियतेचा हुंकार भरत सिध्दूने बैस बंधू आणि पर्गट सिंह या नाराज दिग्गज अकाली नेत्यांसोबत स्वतंत्र लढण्याची तयारी दाखवली.पण मोठ्या पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होण्याचा सिध्दू यांचा मोह सुटत नव्हता म्हणून काँग्रेससोबत बोलणी त्यांनी सुरूच ठेवली.

Loading...

काँग्रेसने सुद्धा सिध्दूला खूप गाजर दाखवलं.सिध्दूच्या या धरसोड वृत्तीला बैस बंधू आणि पर्गट कंटाळले आणि त्यांनी वेगळा मार्ग निवडला.या काळात सिध्दू काहीच निर्णय घेत नव्हते ,याचा परिणाम सिध्दू यांच्या लोकप्रियतेवर आणि क्रेडिबिलिटीवर सुद्धा परिणाम व्हायला लागला पण सिध्दूनं याकडे दुर्लक्ष केलं.

काही दिवसांनी काँग्रेसने सिध्दूची मुख्यमंत्री पद सोडून इतर कुठलीही मागणी मान्य करण्याची तयारी दाखवली.काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री पद देण्याचं आश्वासन दिलं .यावर विश्वास ठेवून सिध्दूच्या आमदार पत्नीने काँग्रेस प्रवेश केला आणि सिध्दू सुद्धा करणार असल्याचे जाहीर केलं . काही दिवसांपूर्वी सिध्दूने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली तेव्हा अमृतसरची लोकसभा सीट,अमृतसरची विधानसभा सीट सिध्दू पती पत्नीला देण्याची तयारी दाखवली पण उपमुख्यमंत्री पदाचं आश्वासन राहुलने दिलं नाही . तरीही सिध्दू काँग्रेस प्रवेश साठी तयार झाले पण अचानक पंजाबचे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि प्रदेश अध्यक्ष अमरिंदर सिंग यांनी जाहीर केले कि सिध्दूला उपमुख्यमंत्री पद आणि त्यांच्याच राजीनाम्यामुळे रिकामी झालेली अमृतसर लोकसभा सीट मिळणार नाही.

विधानसभा निवडणूक सिध्दूने लढवायची की त्यांच्या पत्नीने हा निर्णय सिध्दूने घ्यावा.अमरिंदर यांच्या या एका वक्तव्याने सिध्दू ना घरचे राहिले ना दारचे.आता काँग्रेसमध्ये कोणाशी बोलावे हे सिध्दूला कळत नाहीये,आणि फक्त आमदार होण्यासाठी काँग्रेसमध्ये जायचे का हा त्यांच्यासमोर पडलेला मोठा प्रश्न आहे आणि याच प्रपंचात सिध्दू क्रीज आणि स्टॅम्प सोडून पीचच्या मधोमध उभे आहेत. आणि बाॅलरनं दया दाखवावी ही अपेक्षा करतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2017 10:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...