S M L

मोदी सध्या काय करतायत?

Sonali Deshpande | Updated On: Jan 13, 2017 11:30 AM IST

मोदी सध्या काय करतायत?

MODI KHADI 213 जानेवारी : ती सध्या काय करतेय असं सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे. त्याच धर्तीवर काल आणखी एक सवाल ट्रेंडिंग झालाय आणि तो म्हणजे मोदी सध्या काय करतायत? कारण खादी ग्राम उद्योग विभागाची जी वार्षिक दिनदर्शिका आलीय त्यावरून चरखेवाल्या बापूंचा फोटो गायब आहे आणि त्याऐवजी सूत काततानाचे नरेंद्र मोदी यांची छबी छापली गेलीय.

खादी ग्रामउद्योगच्या कर्मचाऱ्यांनी याविरोधात शांतपणे विरोध दर्शवायला सुरुवात केलीय. एवढंच नाही तर मोदींवर सोशल मीडियातून संताप व्यक्त केला जातोय.

गांधीजी आणि त्यांचा चरखा हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं प्रतिक आहे. त्यातून प्रेरणा घेऊन देशभरात हजारो जण आजही काम करतायत. गांधीजींनी चरख्यावर सूत कातनं हे स्वावलंबनाचं प्रतिक मानलं जातं. जगभरात गांधींजींचा आदर केला जातो.आपलीही तशीच प्रतिमा तयार करण्यासाठी मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर कसोशिने प्रयत्न केलेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी चरख्यावर सूत कातण्याचा प्रतिकात्मक प्रयत्न केलाय आणि तीच छबी आता ग्रामउद्योगच्या दिनदर्शिकेवर आलीय. त्यामुळेच सवाल विचारला जातोय, मोदी सध्या हे काय करतायत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2017 11:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close