तामिळनाडूमध्ये बैलांच्या झुंजीला परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांचं केंद्राला पत्र

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2017 04:47 PM IST

तामिळनाडूमध्ये बैलांच्या झुंजीला परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांचं केंद्राला पत्र

jallikattu-story

09 जानेवारी  : तामिळनाडूमध्ये पोंगलच्या दिवशी जल्लिकट्टू म्हणजे बैलांशी केल्या जाणाऱ्या झुंजीला परवानगी देण्यात यावी, असं पत्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी केंद्र सरकारला दिलंय. अशा शर्यतींमध्ये प्राण्यांवर अत्याचार होत असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने अशा शर्यतींवर बंदी घातलीय. महाराष्ट्रातही अशा प्रकारे जनावरांच्या शर्यतीवर बंदी घालण्यात आलीय.

पोंगलच्या निमित्ताने जल्लिकट्टू स्पर्धा पुन्हा सुरू कराव्या यासाठी आयोजकांनी तामिळनाडू सरकारवर दबाव वाढवलाय. जल्लिकट्टू हा तामिळनाडूचा पारंपारिक क्रीडाप्रकार असल्यामुळे याला मान्यता देण्यात यावी, असं या आयोजकांचं म्हणणं आहे.

अभिनेता कमल हासननेही जल्लिकट्टूच्या आयोजनाला पाठिंबा दिलाय. जर जल्लिकट्टूवर बंदी आणायची असेल तर पूर्ण देशभरात बिर्याणीवरही बंदी आणा, असं कमल हासनने उपहासाने म्हटलंय.

महाराष्ट्रातही सुगीच्या दिवसांमध्ये बैलांच्या शर्यती भरवण्याची परंपरा आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या बंदीनंतर आता अशा शर्यती भरवल्या जात नाहीत. तामिळनाडूमध्ये पोंगलच्या दरम्यान 'जल्लिकट्टू'ला परवानगी मिळाली तर महाराष्ट्रातही अशा शर्यतींना परवानगी मिळू शकते.

Loading...

जल्लिकट्टूमध्ये बैलाशी झुंज लावणाऱ्यांना गंभीर अपघात झाल्याच्या घटना याआधी घडल्यात. याआधी, जल्लिकट्टूमध्ये २०१० ते २०१४ या काळात ११०० जण जखमी झाले तर १७ जणांचा मृत्यू झालाय. त्याचबरोबर पेटा आणि आणखी काही प्राणीप्रेमी संघटनेने या खेळाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या खेळावर बंदी घातलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 02:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...