...मग तुम्हाला पदावरुन का हटवू नये ?, लोकलेखा समितीचा पटेलांना सवाल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2017 02:40 PM IST

urjit_patel4309 जानेवारी : 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय कसा घेतला ?, पदाचा तुम्ही गैरवापर केला तर तुम्हाला का हटवू नये अशी प्रश्नांची सरबती करत संसदेच्या लोकलेखा समितीने नोटबंदीवरून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना धारेवर धरलंय.

नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने खेळलेल्या नियमांच्या सापशिडीमुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. कोणत्या कायद्याच्या आधारे रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्यावर मर्यादा घातली, असा सवाल समितीने गव्हर्नर पटेल यांना केला आहे.

'सामना' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ही कायदा नसताना आपण पदाचा दुरुपयोग केला आहे. असा सवाल लोकलेखा समितीने केला आहे . त्यामुळे तुम्हाला पदावरून का हटवू नये, असा सवाल करत समितीने नोटबंदीसंदर्भात पटेल यांना दहा प्रश्न विचारले आहेत. पटेल यांना 28 जानेवारीला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.

संसदेच्या लोकलेखा समितीचे सवाल

- कोणत्या कायद्याने पैसे काढण्यावर मर्यादा घातली?

Loading...

- निर्णय जर रिझर्व्ह बँकेचा होता, तर नोटबंदी देशहिताची असल्याचं रिझर्व्ह बँकेने केव्हा ठरविलं ?

- एका रात्रीत ५००, १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यामागे रिझर्व्ह बँकेला असं कोणतं कारण सापडलं ?

- पियूष गोयल यांच्या विधानाशी आपण सहमत आहात का ?

८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसाठी रिझर्व्ह बँकेच्या मंडळ सदस्यांना केव्हा सूचना देण्यात आली ?

नोटबंदीच्या बैठकीला कोण उपस्थित होते ?

किती वेळ ही बैठक चालली ?

बैठकीचा अहवाल कुठे आहे ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...