S M L

पेट्रोलपंप चालकांचा क्रेडिट,डेबिट कार्ड स्वीकारण्यास नकार

Sonali Deshpande | Updated On: Jan 9, 2017 08:59 AM IST

Image img_218992_petrolpumpstrik_240x180.jpg

08 जानेवारी : एकीकडे मोदी सरकार कॅशलेस व्हा सांगत असतानाच दुसरीकडे बँकांनी कार्डांद्वारे केल्या जाणा-या व्यवहारावर अधिभार आकारण्यास सुरुवात केली आहे. बँकांनी कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर एक टक्का सरचार्ज आकारणे सुरू केल्यानंतर याच्या निषेधार्थ सोमवारी ९ जानेवारीपासून देशभरातील कोणत्याही पेट्रोल पंपावर क्रेडिट अथवा डेबिट कार्डावर इंधन न देण्याचा निर्णय ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन या पेट्रोल पंपचालकांच्या संघटनेनं जाहीर केला.

केंद्र सरकारनं डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्यांना इंधनाच्या दरात ०.७५ टक्के सूट देण्याची योजना जाहीर केलेली असताना पेट्रोल पंपचालकांच्या या निर्णयानं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. संघटनेचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, ९ जानेवारीपासून क्रेडिट कार्डाच्या सर्व व्यवहारांवर सरसकट एक टक्का आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर ०.२५ ते एक टक्क्यांपर्यंत एमडीआर शुल्क आकारून ते पेट्रोल पंपचालकांच्या खात्यातून परस्पर वळते करून घेतले जाईल, असं एचडीएफसी,आयसीआयसीआय,एचडीएफसी बँकांनी आम्हाला कळवलं आहे. त्यामुळे आम्ही पेट्रोल पंपावर क्रेडिट अथवा डेबिट कार्डावर इंधन न देण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, पीओएस यंत्रं देणाऱ्या ज्या बँका असे शुल्क न लावण्यास तयार असतील त्यांनी आम्हाला तसे कळवावे जेणेकरून त्या बँकांच्या कार्डांवर इंधन विक्री करा, असे आम्हाला आमच्या पेट्रोलपंप चालकांना सांगता येईल, असेही बन्सल यांनी पत्रकात म्हटलं आहे.

अनेक पेट्रोल पंपांवर आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेच्या स्वाइप मशीन्सचा वापर केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2017 08:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close