नोटबंदीमुळे देशाची आर्थिक प्रगती मंदावेल - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

नोटबंदीमुळे देशाची आर्थिक प्रगती मंदावेल - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

  • Share this:

pranab mukharjee12

05 जानेवारी :  नोटबंदीचा निर्णय काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी घेण्यात आला असला तरी यामुळे देशाची आर्थिक प्रगती मंदावेल, असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी दिलाय. 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच्या काळात गरिबांचे हाल झाले. पण ही हानी भरून काढण्यासाठी आपल्याला जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे, असं प्रणव मुखर्जी म्हणाले.

राष्ट्रपती भवनातून राज्यपालांशी व्हिडि    ओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी हा इशारा दिला. ही सगळी स्थिती सुधारेपर्यंत गरीब लोक किती तग धरू शकतात याबद्दल मला खात्री देता येत नाही, असंही ते म्हणाले. गरिबी, बेरोजगारी आणि शोषणाच्या विरोधात भारतातली सामान्य जनता आवाज उठवू शकते, असा इशाराही त्यांनी दिलाय.

याआधी दहा दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये बोलताना मात्र प्रणव मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आशादायक वक्तव्य केलं होतं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगली प्रगती झालीय, असं राष्ट्रपती म्हणाले होते. नोटबंदीमुळे बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचार रोखला जाईल, असं वक्तव्यही आधी त्यांनी केलं होतं. पण आता मात्र राष्ट्रपतींनी नोटबंदीमुळे गरिबांच्या समस्येकडे लक्ष वेधलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 5, 2017, 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading