S M L

बंगळुरू विनयभंगप्रकरणी चार आरोपींना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Jan 5, 2017 09:31 PM IST

बंगळुरू विनयभंगप्रकरणी चार आरोपींना अटक

sadasda

05 जानेवारी : बंगळुरूमधील त्या मुलीच्या विनयभंगप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या चारही आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 31 डिसेंबरला पार्टी संपल्यानंतर घरी परतत असताना 6 जणांनी या मुलीसोबत अश्लिल वर्तन केलं होतं. बंगळुरू पोलीस आयुक्त प्रवीण सुद यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधी माहिती दिली. अयप्पा उर्फ नितीश कुमार असं मुख्य आरोपीचं नाव असून तो डिलिव्हरी बॉय आहे. अयप्पा यानेच मुलीला पकडले होते आणि तिच्यासोबत अश्लिल वर्तन केलं होतं. अन्य आरोपींमध्ये लेनो उर्फ लेनीन पॅट्रीक, सोम शेखर उर्फ चिनी आणि सुदेश उर्फ सुदी अशी आरोपींची नावं आहे.


या 6 जणांपैकी चार जणांची ओळख पटली असून त्यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. उर्वरित दोन आरोपी अजूनही फरार असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2017 09:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close