04 जानेवारी : पाकिस्तान आणि चीनशी एकत्र युद्ध लढावं लागण्याची शक्यता हे वास्तव आहे. लष्कर यासाठी सज्ज आहे, असं भारताचे नवे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक थांबली नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गुप्तचर यंत्रणा आणि तांत्रिकी बाबींमध्ये भारतीय लष्कर कुणापेक्षा मागे नाही, असं ते म्हणाले. तसंच, लष्कराचं मनोबल वाढवणं आणि जवानांना सशक्त बनवण्याला प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया रावत यांनी दिली आहे.
सीमेवर शांतता ठेवणं ही सैन्याची जबाबदारी आहे. पण गरज पडल्यास धाडसी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराच नवनियुक्त लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे. रावत यांनी 1 जानेवारीला भारताचे 27 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv