दाऊदला दणका; युएई सरकारकडून 15 हजार कोटींची संपत्ती जप्त

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 4, 2017 08:46 AM IST

Dawood Ibrahim123

04 जानेवारी : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधात संयुक्त अरब अमिरात (UAE) सरकारने चांगलाच दणका आहे. दाऊदची तब्बल 15 हजार कोटींची संपत्ती जप्त केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी यूएई सरकारला यासंद्रर्भात विनंती केली होती. त्यानंतर युएई सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर दाऊद इब्राहिमच्या कारभाराला मोठा हादरा बसणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएई दौऱ्यादरम्यान भारताकडून दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा तपशील दिला होता, त्यानंतर यूएई सरकारकडून दाऊदविरोधात पावलं उचलण्यास सुरुवात झाली होती. अखेर 15 हजार कोटींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करत यूएई सरकारने दाऊदला जबरदस्त दणका दिला आहे.

भारताकडून ईडीने जगातील 6 देशांना दाऊदच्या संपत्तीवर कारवाई करण्याबाबत पत्र लिहिलं होतं. या सहा देशांम्ये ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, यूएई, तुर्कस्तान, साइप्रस आणि मोरक्को यांचा समावेश आहे. दाऊद गेल्या 23 वर्षांपासून भारताच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगारांच्या यादीत आहे. त्याच्या काळ्या कमाईचं जाळं जगभरात पसरले आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. कशाप्रकारे प्रयत्न केले जात आहे, याबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नाही.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 4, 2017 08:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...