S M L

एक पक्ष काळा पैसा वाचवतोय तर दुसरा मुलगा -मोदी

Sachin Salve | Updated On: Jan 2, 2017 08:31 PM IST

एक पक्ष काळा पैसा वाचवतोय तर दुसरा मुलगा -मोदी

02  जानेवारी : उत्तर प्रदेशातील एक पक्ष काळे पैसे पांढरे करण्याच्या मागे लागलाय तर दुसरा पक्ष कुटुंब वाचवायच्या मागे लागलाय अशी खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपा आणि काँग्रेसवर केली.  आम्ही मात्र देश वाचवण्याच्या मागे लागलो असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज लखनऊमध्ये परिवर्तन रॅली झाली. आपल्या आयुष्यातील ही सगळ्यात मोठी रॅली असल्याचं पंतप्रधान मोदींनी रॅलीच्या सुरूवातीलाच सांगितलं. कारण या रॅलीसाठी अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती. यावेळी मोदी यांनी सपा, बसपा सहीत काँग्रेसवरही खरपूस टीका केली. त्यासोबतच देशाचा विकास करायचा असेल तर उत्तर प्रदेशचा विकास होणं गरजेचं असल्याचं सांगत नागरिकांना परिवर्तनासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

यासोबतच उत्तर प्रदेशातील गुंडागर्दी संपवून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध राहू असंही त्यांनी या रॅलीत सांगितलं. तसंच पक्षीय राजकारण आणि जातीपातीवर आधारित व्यवस्था बाजूला सारत विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजपला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2017 05:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close