S M L

यूपीत यादवी संघर्ष शिगेला, आता 'सायकल'साठीही 'दंगल'

Samruddha Bhambure | Updated On: Jan 2, 2017 12:54 PM IST

यूपीत यादवी संघर्ष शिगेला, आता 'सायकल'साठीही 'दंगल'

02 जानेवारी:  जवळपास संपूर्ण समाजवादी पक्ष ताब्यात घेतल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पक्षाचे चिन्ह असलेल्या सायकलवर दावा केला आहे. त्यामुळे समाजवादी पक्षातील अंतर्गत यादवी आता निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहचली आहे.

गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या समाजवादी पक्षातला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवल्यानंतर अखिलेश यादव यांचे समाजवादी पक्षावर संपूर्ण ताबा घेतला आहे. पण वडील मुलायम सिंह यांनी पक्षाचं चिन्ह आपल्याकडेच रहावं यासाठी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. मुलायम सिंह आणि शिवपाल सिंह हे दोघेही आज दिल्लीत आयोगाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेऊ या चिन्हवर दावा करणार आहेत.समाजवादी पक्षात सध्या दोन अध्यक्ष आहेत. मुलायम आणि अखिलेश या पिता-पुत्रामधील वाद तीव्र झाला आहे. काही कायदेतज्ज्ञांच्या मते नियमानुसार एका पक्षात अध्यक्ष पदाचा वाद, पक्षाचे विभाजन अशा घटनांमध्ये निवडणूक आयोग पक्षाचे अध्यक्ष कोण होणार याचा निर्णय देते. जर निवडणुकांपर्यंत पक्षातील यादवी मिटली नाही तर समाजवादी पक्षाला त्यांचे सायकलचे चिन्ह गमवावं लागेल आहे.

दरम्यान, समाजवादी पक्षातल्या 200 हुन अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने अखिलेश स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची भीती वडिलांना आहे. त्यामुळेच हा सगळा खटाटोप सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2017 12:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close