एटीएममधून आता निघणार साडेचार हजार रुपये

  • Share this:

atm_new_Cash

01 जानेवारी : आजपासून तुम्हाला एटीएमएमधून अडीच हजारांऐवजी साडेचार हजार रुपये काढता येणार आहे. नोटबंदीच्या घोषणेनंतर एटीएममधून पैसै काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती.

मात्र आठवड्याला बँक खात्यातून 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनिवासी भारतीयांना नोटा बदलून घेण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. ही मुदतवाढ ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान परदेशात असणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठीच लागू असेल.

३० जूनपर्यंत त्यांच्याकडे असणाऱ्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात. मात्र ही मुदतवाढ नेपाळ, भूतान, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये असणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू असणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2017 01:00 PM IST

ताज्या बातम्या