पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 1, 2017 12:24 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

modi_speech_pointer31 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केलं. सर्वसामान्यांना नववर्षाची भेट दिली असून अनेक घोषणाचा पाऊस पाडला आहे. घरं, उद्योजक, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या घोषणा केल्या आहे. त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे....

- चांगल्या कामासाठी नागरिक, सरकारनं एकत्र येवून काम करताहेत, इतिहासात याला तोड नाही - पंतप्रधान मोदी

- मला माहिती आहे, आपलाच पैसा काढण्यासाठी लोकांना रांगेमध्ये उभं राहावं लागलं, या दरम्यान मला शेकडो पत्र आलेत -पंतप्रधान मोदी

- नववर्षात बँकीग व्यवस्था सामान्य स्थितीत येईल -पंतप्रधान मोदी

- विशेषत: ग्रामीण भागात हे प्रामुख्याने केल जाईल -पंतप्रधान मोदी

Loading...

- ग्रामीण भागीतल जनतेच, शेतकऱ्यांचा त्रास कमी होणार -पंतप्रधान मोदी

प्रामाणिपणाला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे, सरकार अशा लोकांचा मित्र आहे आणि बेईमानांचा कर्दनकाळ आहे - पंतप्रधान मोदी

 केवळ 24 लाख लोकांची वार्षिक उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त आहे  अशी माहिती सरकारकडे आहे, हे खरं चित्र नाही - पंतप्रधान मोदी

या काळात देशवासीयांनी ज्या संकटाला तोंड दिलं, जे काही सहन केलं ते कौतूकास्पद आहे -पंतप्रधान मोदी

- गेल्या काही वर्षात काळा पैसा, समांतर अर्थव्यवस्थेत जास्त चालत होता. अन्य देशातही इतकी समांतर अर्थव्यवस्था नव्हती-पंतप्रधान मोदी

 हा पैसा, काळाबाजार वाढवत होते, भ्रष्टाचार वाढवत होते, गरिबांना लूबाडत होते -पंतप्रधान मोदी

ड्रग्स, मानव तस्करी, दहशतवादी काळ्या पैशावर अवंलबून असतात. एका निर्णयामुळे या सर्वांना उद्धवस्त केलंय -पंतप्रधान मोदी

 नागरिकांपेक्षा जास्त जबाबदारी अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची आहे - पंतप्रधान मोदी

अर्थव्यवस्थेच्या बाहेर गेलेला पैसा-बँकाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत परत आलाय -पंतप्रधान मोदी

बँक, पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी या काळात खूप मेहनत घेतली, ते कौतूकास्पद आहे -पंतप्रधान मोदी

 या दरम्यान, काही बँक अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांनी परिस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. अशा अधिकाऱ्यांना मी सोडणार नाही -पंतप्रधान मोदी

- नववर्षात सरकार नव्या योजना आणणार -पंतप्रधान मोदी

- लाखो लोकांना घरे नाहीत,प्रधानमंत्री आवास योजनेत गरीब वर्गाना घर देण्यासाठी नव्या योजना -पंतप्रधान मोदी

- ड्रग्स, मानव तस्करी, दहशतवादी काळ्या पैशावर अवंलबून असतात - एका निर्णयामुळे या सर्वांना उध्वस्त केलय

- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 33 टक्के जास्त घरं बांधणार - पंतप्रधान मोदी

- 2017 मध्ये गावातील लोकांना घर बांधायचं असेल, त्यांना 2 लाख रुपये कर्जात 3 टक्के सूट देणार -पंतप्रधान मोदी

-  9 लाख रुपयाच्या गृहकर्जावर 4 टक्के सूट -पंतप्रधान मोदी

 

- 12 लाख रुपयाच्या गृहकर्जावर 3 टक्के सूट -पंतप्रधान मोदी

 - गावात घर बांधण्यासाठी, 2 लाख रुपये कर्जामध्ये 3 टक्के सूट -पंतप्रधान मोदी

- लघू व्यावसिकांना 2 कोटीचा व्यवसाय केलेल्या व्यापाऱ्यांच्या डिजीटल टॅक्स, 6 टक्के उत्पन्न समजून वसूल करणार -पंतप्रधान मोदी

लघू व्यावसायिकांना जास्त कर्ज मिळेल, व्याजदरही कमी असणार  - - पंतप्रधान मोदी

 लघू उद्योजकांना कॅश क्रेडीट मर्यादा 20 पासून 25 टक्यांवर करणार -पंतप्रधान मोदी

 लघू व्यावसिकांसाठी कर्जासाठी सरकारी क्रेडीट गँरटी 1 कोटीहून 2 कोटीपर्यंत -पंतप्रधान मोदी

किसान क्रेडीट कार्डाच रुपांतर रुपया कार्डात करणार, शेतकरी खरेदी, विक्री करु शकतील -पंतप्रधान मोदी

-ज्येष्ठ नागरिकांसाठी - साडे सात लाखाच्या डिपॅाझिटवर, 8 टक्के व्याजदर करणार आणि प्रत्येक महिन्यात त्यांना व्याज मिळणार -पंतप्रधान मोदी

गर्भवती मातांसाठी देशाच्या सर्व जिल्हात,सरकार रुग्णालयात, उपचाराचा 6 हजार रुपये देणार - पंतप्रधान मोदी

गर्भवती मातांना 6 हजार रुपये मिळणार  थेट खात्यात जमा करणार -पंतप्रधान मोदी

3 कोटी किसान क्रेडीट कार्डाचं, रुपया कार्डात बदलवणार -पंतप्रधान मोदी

- नवे संकल्प, नवा जोश, नव्या आशा घेवून भारतीय नववर्षाचं स्वागत करणार - नरेंद्र मोदी

- सव्वाशे कोटी भारतीयांच्या पाठिंब्यामुळे शुध्दी यज्ञ चालला, अनेक वर्ष हा सुरु राहणार - मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2016 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...