नववर्षात एटीएममधून 2500 पेक्षा जास्त पैसे काढू शकतात !

नववर्षात एटीएममधून 2500 पेक्षा जास्त पैसे काढू शकतात !

  • Share this:

atm_new_Cash31 डिसेंबर :  नोटबंदीचे 50 दिवस पूर्ण झाले आहे. 50 दिवसानंतर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. आता एटीएममधून 2500 रुपयांची मर्यादा हटवण्यात आली असून नव्या वर्षात 4500 रूपये काढू शकता.

नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनटंचाईच्या पार्श्वभूमीवर एटीएममधून पैसे काढण्यावर आलेली मर्यादा आता काढण्यात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत एटीएममधून फक्त अडीच हजार रुपयेच काढता येत होते. मात्र, १ जानेवारीपासून एटीएममधून साडेचार हजार रुपये काढता येणार आहेत. केंद्र सरकारकडून शुक्रवारी रात्री उशिरा यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 31, 2016, 2:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading