S M L

सर्जिकल स्ट्राईकनंतरही दहशतवादी हल्ल्यात 33 जवान शहीद

Sachin Salve | Updated On: Dec 29, 2016 07:05 PM IST

सर्जिकल स्ट्राईकनंतरही दहशतवादी हल्ल्यात 33 जवान शहीद

29 डिसेंबर : गेल्या 28 सप्टेंबरपासून काश्मीरमध्ये आतापर्यंत 33 जवान शहीद झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.  2015 च्या तुलनेत ही संख्या 82 टक्क्यांनी जास्त असल्याचा अहवाल इंडियास्पेंडने दिला आहे.

पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरात भारताकडून सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता. या कारवाईत 38 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या कारवाईनंतर दहशतवाद्यांचं चांगलेच धाबे दणाणले होते.  पण ज्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केलं होतं त्यानंतरही या सर्जिकल स्ट्राईकचा कोणताचं परिणाम झालेला नाही आहे.

उलट परिस्थिती अधिक चिघळली असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर दहशतवादी हल्ले, गोळीबारात जवान जखमी होण्याचं प्रमाणही दुपटीने वाढल्याची माहिती इंडियास्पेंडने दिली आहे. सप्टेंबरपासून ते आतापर्यंत 33 जवान शहीद झाले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 29, 2016 06:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close